Tuesday, December 30, 2008

Welcome 2009 ...

उद्या अजुन एक नवीन दिवस .. 
सुंदर आणि आल्हाद कारी सकाळ घेऊन येईल... 
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल ... 
प्रतेक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची ... 
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.... 
Welcome 2009 ...

Wednesday, November 26, 2008

एकदा मी मला शोधायला निघालो ...

एकदा मी मला शोधायला निघालो ...
रस्त्याने जाताना ... इकडे तिकडे पाहत ...
कधी गाडीवर .. कधी रिक्षामधे ...
कधी ड्राइविंग करतोय
तर .. कधी शिळ मारतोय ...
कधी उन्हात मी ..
तर कुठे सावलीत मी ...
सगळीकडेच मीच मी भरून आहे असे वाटले ...
नि मी एक दीर्घ श्वास घेऊन स्वत:च्या आभासाने ... मुग्ध झालो....

Sunday, November 23, 2008

नदीच्या पाण्यातील प्रतिबिंब आणि आरश्यातील प्रतिबिंब यामधे फरक तो काय? ...

नदीच्या पाण्यातील प्रतिबिंब आणि आरश्यातील प्रतिबिंब यामधे फरक तो काय? ...
नदी ज्यावेळी प्रतिबिंब दाखवते ...
त्यावेळी .. तिच्या प्रवाहाचा वेग ...
पाण्याची निर्मळ ता .. आणि तळाचा भाग ....
ह्या सर्व गोष्टी पडलेल्या प्रतिबिंबामधे अंतर्भुत असतात...
म्हणजे एक प्रकारे ...
नदी स्वत:चे स्वत्व अबाधित ठेवून ...
दुसर्‍याचे मूलयमापन करते ...
आरश्याचे तसे नसते ..
जे आहे जसे आहे ते असे आहे असे तो म्हणतो ...

Tuesday, November 18, 2008

गिरीशशी मारलेल्या गप्पा

या आधीची पोस्ट ही होती ... आणि त्याबद्दल थोडी चर्चा झाली... तीच देतो आहे इथे

ती म्हणाली एक गोष्ट सांगिशील ," श्रध्धा आणि विश्वास या मधे नेमका फरक
तो काय ?" ...
विश्वास ठेवण्यासाठी माणसाचा भूतकाळ पुरेसा असतो
आणि कृती करायची जबाबदारी दुसर्यावर ढकललेली असते ...
श्रध्धेचे तसे नसते ...
आपली कृती आपल्या श्रध्धेला अजुन बळकट करते ...
आणि जबाबदारी स्वत:वर घेण्यासाठी तत्पर असते ती म्हणजे श्रध्धा ...

------------------------------------------------------------------------------------------------

गिरीश: माझी एका गोष्टीवर श्रध्धा आहे आणि माझ्या श्रध्धेवर माझा विश्वास आहे...
म्हणजे ?

शिरीष: श्रध्धेवर विश्वास नसतो
श्रध्धेवर विश्वास म्हणजे अंधश्रध्धा
श्रध्धा निर्मल असते

गिरीश: म्हणजे विश्वास निर्मल नसतो...

शिरीष: विश्वासा मागे गरज असते .. कधीकधी स्वार्थ असतो
आणि कुणी विश्वास मोडला तर ... जबाबदारी त्याच्यावर ढकलून आपण मोकळे
व्हयायचा मार्गही असतो

गिरीश: तुझा देवावर विश्वास आहे की श्रध्धा?

शिरीष: देवावर श्रध्धा असावी

गिरीश: Just casual ... नास्तिक किंवा आस्तिक असा मुद्दा नाही
श्रध्धा ही विश्वासातून जन्माला येते असे माझे मत आहे

शिरीष: हो ती आता .. कारण आपल्याला .. हजारो वर्षांचा भूतकाळ आहे म्हणून
म्हणून बर्‍याच जणांना अजूनही त्यांचा देवावरचा विश्वास म्हणजे श्रध्धा वाटते

गिरीश: याही पेक्षा मला वाटते कि..ज्या विश्वासाला परखुन बघण्याची कधीच
गरज वाटत नाही ...ती श्रध्धा..ऽनि ज्या ठिकाणी पारख ण्याचा सवाल येतो
तिथे आपण आपल्या विश्वासावर शंका घेतळालेलीच असते..

शिरीष: ..ज्या विश्वासाला पारखून बघण्याची कधीच गरज वाटत नाही... म्हणजे?.

गिरीश: देवावरचा विश्वास .... तुम्ही तो कधी पारखून बघण्याच्या नादी
लागत नहि..तो कायम असतो.. कधीही .. कुठेही..

शिरीष: नादी का लागत नाही ...?

गिरीश: जर त्यात शंका उत्पन्न झाली की तो विश्वास होतो श्राध्धा राहत नाही

गिरीश: नादी लागत नाही असे मी म्हणालो नहि...जेव्ह नदी लागतो तेव्हा
तो फक़त विश्वास असतो ... नदी लागलो नाही तर ती श्राध्धा असते..

शिरीष: असे नसते रे ... चंगुल पानावरची श्राध्धा आणि देवावरची श्रध्धा
हे वेगवेगळे असेल .. तर असे नसते

गिरीश: ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत .. त्यामुळे आपल्या व्याख्या पण
सापेक्ष होतील .. पण एक गोष्ट मला नक्की वाटते चांगुल पणा वरचा विश्वास
दृढ झाला की श्रध्धा व्हायला वेळ लागत नाही

शिरीष: चांगुल पणा वर विश्वास असणारा माणूस ... म्हणजे .. पापभिरू
सामान्य माणूस .. आणि चांगुल पानावर श्रध्धा असणारी व्यक्ती म्हणजे ...
श्यामची आई...

गिरीश: या मताशी मी सहमत आहे ... जेव्हा त्या सामान्य पापभिरू माणसाचा
विश्वास श्रध्धेत प्रवर्तीत होईल तेव्हा तो ही श्यामाच्या आईसारख्याच
कॅळीबेरचा होईल हे नाकारता येणार नाही..

गिरीश: पण तरीही श्रध्ेच्या मुळशी विश्वास असावा लागतोच या मताचा मी आहे..

शिरीष: You can always be

शिरीष: माझेही तेच मत आहे ....
फक्त एव्हडेच ... की मी फरक सांगत होतो...
आणि तू डिपेंडेन्सी सांगत होता

गिरीश: चला छान Refresh वाटळ .. बर्‍याच दिवसाणी काही तरी विचार
कार्याला मिळाला साहित्यात...

शिरीष: :)

श्रध्धा आणि विश्वास

ती म्हणाली एक गोष्ट सांगिशील ," श्रध्धा आणि विश्वास या मधे नेमका फरक तो काय ?" ...
विश्वास ठेवण्यासाठी माणसाचा भूतकाळ पुरेसा असतो
आणि कृती करायची जबाबदारी दुसर्यावर ढकललेली असते ...
श्रध्धेचे तसे नसते ...
आपली कृती आपल्या श्रध्धेला अजुन बळकट करते ...
आणि जबाबदारी स्वत:वर घेण्यासाठी तत्पर असते ती म्हणजे श्रध्धा ...

Wednesday, October 15, 2008

स्वत:कडे अस पहाव

स्वत:कडे अस पहाव ..
 की स्वत:चाच अभिमान वाटेल ... 
वाईट नजरेने पाहण्याचा  कुणी प्रयत्न जरी केला ... 
तरी त्याची नजर आपोआआप झुकेल.... 

Tuesday, October 14, 2008

कुणीतरी मला विचारले , " I am perfect IF " -

कुणीतरी मला विचारले , " I am perfect IF " - 
जर आणि तर - खूप साधे शब्द ...  त्यांचा साधेपणा शब्दात वर्णन करणे अशक्यच .....
 मी जसा आहे तसाच जर मला आवडू शकलो 
तर सर्वात मोठा "जरबाजूला झाला...  

Wednesday, October 8, 2008

एक गोष्ट

ती म्हणाली ,
"एक गोष्ट सांगू ... आत्ता सांगू की रात्री सांगू " ...
मी म्हणालो ," आत्ता सांग " ...
" नको आत्ता नको मी रात्री सांगते " ...
च्यायच बेन !!

Monday, October 6, 2008

साधे प्रश्न

ती एकदा मला म्हणाली , 
"तू नेहमीच मला असे कोड्यात का टाकतोस रे ?  
माझ्या सारखे साधे प्रश्न तुला कधी विचारताच नाही येणार का ...? " 
सांग बर ... 
मी तुला का आवडते ? " .........
नि मी आपला ~~~~ वासून तिच्याकडे बघत राहिलो.......  

Tuesday, September 30, 2008

" तुला माहितेय ? ... "

" तुला माहितेय ? ... "
असे म्हणून प्रत्येक वाक़याची सुरूवात व्हायची ...
आणि माहीत नसलेली अजुन एक गोष्ट
मला माहीत व्हायची ...

Monday, September 29, 2008

"आणि" ....

एकदा मला एक कारण सांगायचे होते ...
कारण सांगितले नि मी म्हणालो "आणि" ....

माझी स्तुती एका वाक़यात कर असे ती म्हणाली ...
"मला जशी माझी ती हवी होती तशी तू आहेस "
नि ती म्हणाली "आणि" ....

Tuesday, September 23, 2008

प्रतिबिंब

असह्य वेदना .. म्हणजे मनातील अन्तर्मनाचे एक प्रतिबिंब होते ...
त्या ज्यावेळी दृष्य झाल्या त्यावेळी... सगळीकडून प्रश्न आला.....
अरे ... तू तर असा नव्हतास.............

पावसाच्या घरी

एकदा चुकुन पावसाच्या घरी गेलो....
गळणार्‍या घरामध्ये तोही छत्री धरून बसला होता....

Monday, September 22, 2008

चांदणे

अशक्य वाटावे असेच सगळे घडत होते ...
ओठांनी नाही म्हणत ...
डोळ्यांमधे तुझ्या पौर्णिमेचे चांदणे पडत होते ....

उन

ओलेत्या पावलाने आज उन चालत आले...
ग्रीष्माच्या स्पर्शाने वसंताला धुंद करून गेले...

Thursday, September 18, 2008

प्रवास ...

काहीतरी शोधायचे म्हणून मी निघालो होतो जगाच्या प्रवासा ...
आणि शेवटी काय तर .. अमेरिकेत जाऊन मी भाजी पोळीचे गोडवे गाऊ लागलो...

Tuesday, September 16, 2008

कळत नकळत

तुझ्याही नकळत ...
माझ्याही नकळत ..
घडायचे ते घडून गेले ...

डोळ्यांनी बोलायचे बंद केले ...
झूरणरे अश्रुही विरून गेले ...
घडायचे ते घडून गेले ...

स्पर्शही नकळत बोलका झाला ...
जरी फक्त मज ओठाना केस तुझा स्पर्शून गेला...
घडायचे ते घडून गेले ...

मनातील गुपितही अलगद ओठी आले ..
हवे ते जुळून आले..
आणि घडायचे ते घडून गेले ...

तुझ्याही नकळत ...
माझ्याही नकळत ..
घडायचे ते घडून गेले ...

Friday, September 12, 2008

ती

ज्याहि वेळी ती लाजून माझ्याकडे पाहते ...
खर सांगतो ...
तिला पाहण्यासाठी हवाही क्षणभर हळू हळू वाहते ...

मी

मी जसा आहे तसा व्यक्त व्ह्यायला लागलो ...
आणि मी मला अजुनच आवडायला लागलो ...

Wednesday, September 10, 2008

Charoli

हृदयाची भाषा मला अचानक कळायला लागली....
जणू माझ्यातल्या प्रत्येक कणाची जाणीव जिवंत व्ह्यायला लागली ...

Friday, August 29, 2008

पंख

फुलपाखरांसारखे उडायला मलाही जमले असते ...
भीती वाटली ती चूरगाळले जाण्याची....
माझे मन हळूच मला कानात म्हणाले ,
" पंख असूनही भरारी घेण्याची वाट पाहत आहेस ...
तुझा देश आणि आणि तुझे देशवासीय एका नेत्याची वाट पाहत आहेत ... "

हायकू

रंगानाही गंध जेव्हा यायला लागला ...
पाण्यामध्येही आसमंत जिवंत व्हायला लागला...

Thursday, August 21, 2008

माणसे प्रश्न कधी विचारतात?

माणसे प्रश्न कधी विचारतात... तर त्यातून त्यांना काहीतरी हवे असते ...
कधी उत्तर माहीत असते ...
तर कधी उत्तरा नंतर होणारा संभ्रम माहीत असतो...
प्रत्येक प्रश्नातुन काही नाही काही जे विचारले नाही ते जाणून घ्यायची अलिप्त इच्छा असते ...
जर ती पूर्ण झाली ... तर माणूस तृप्त होतो... अगदी मनासारखे उत्तर भेटल्यासारखा....

Wednesday, August 20, 2008

जाने तू या जाने ना - एक प्रश्न ..

काल जाने तू या जाने ना चे ... कभी कभी आदिती ... गाणे बघत होतो....
छान वाटत होते ... एकदम सुरेल गाणे ... त्यातल्या भाव भावना .. संवेदना ... आणि बरेच काही ....
एका ठिकाणी अचानक मन अडकले... .थबकले .. आणि थोडे कासावीस झाले ...
सर्वात शेवटी ज्यावेळी जय आदितीला दुसरे छोटे मांजरचे पिल्लू आणून देतो ना ...
त्यावेळी ती खुद्कन हसते ... आणि त्याला मिठी मारते ....
सगळ्यांच्या दृष्टीने ... तो क्षण खूप महत्वाचा....
पण तिचे काय ? .... जी आधी तिला सोडून गेली ....
जिच्यासाठी हा आटापिटा सुरू होता....
नक्की तिच्यासाठीच होता ना ....?
की दुसरी मांजर आणून दिली म्हणजे ती गेल्याचे दुख: संपले ..........?
प्रश्न मला पडला आणि खूप वेदना झाल्या ...
एक गोष्ट सांगू ... ज्याही वेळी तुम्ही हे वाचाल ना .. त्यावेळी नक्की Reply करा ... की तुम्हाला काय वाटले ... मला जे वाटले ... त्यात नेमके काय साचले आहे ... तिला जे वाटले ते योग्य आहे का ?

Wednesday, July 23, 2008

तू म्हणजे

सौंदर्याच वर्णन करायला गेलो ..
नि तू आठवलीस ..
शब्दांची गुंतागुंत वाढली होती ...
नि तू आठवलीस ..
फक्त मी गोंधाळायचा अवकाश ...
नि तू आठवलीस ..
खर सांगू ... तू म्हणजे माझ विसाव्याच स्थान ...

Thursday, July 3, 2008

Amarnath Land issue Sign the Petition to President of India


Hello Indians,
 
All Indians I request you to sign this Petition and let the President knows we will not keep quite on this kind of things.
 
 
See the thing what is going on in India . Is it India........?
 
Kashmir celebrates, Jammu burns :
 
Under pressure from protests organised by separatist forces in the Valley, the Jammu and Kashmir government on Tuesday revoked the order transferring 39.88 hectares of forest land to the Amarnath shrine board.

In Jammu, a series of  protest demonstrations were held against the rescinding of the land order. Pitched battles that followed left more than 80 injured in police action.

The authorities imposed curfew in some Jammu areas, when the situation appeared to be getting out of hand.
Meanwhile, Action Committee Against Land Transfer (ACALT) has described the revocation of order as "peoples' win" and called upon people to call off the strike. "It is the first win of the people of Kashmir. We should celebrate it. So far, we had been observing blackout in protest. Let us illuminate our houses tonight," advocate Mian Qayoom, head of the ACALT said.  
As Qayoom was still talking, Lal Chowk the centre of protests for the past nine days reverberated with sounds of firecrackers. Several other places in the city and district headquarters also witnessed similar celebrations. 
 
 
 
Govt takes over Amarnath yatra :
Caught on a sticky wicket after the Peoples' Democratic Party (PDP) pulled out over the land transfer issue, the Jammu and Kashmir government has decided to take over the responsibility of the Amarnath yatra from the shrine board.
 
What the hell they are talking about secularism ?
Don't keep quite .
 
 
Regards,
Shirish


Wednesday, July 2, 2008

स्वातंत्र्याचा आनंद

"The girl whom I love, I wish to be free -- even from me."

जगण्यात बंधन आली तर आनंद नष्ट होतो ...
आणि स्वातंत्र्याचा आनंद Uncomparable असतो ...
जर मी तो तिला देऊ शकलो ...
तर बाकीच्या गोष्टी गौण असतील...
आणि मला नेहमी तिच्या चेहर्यावर मला हव असलेले हसू पाहायला भेटेल ...

तू म्हणजे ..

तू म्हणजे ..
एका विचार आहेस
मनात कोरलेला
तू अस्तित्वात नसतानाही ..
माझ्या मनात मुरलेला...

Monday, June 30, 2008

समाधान

कधी काही कळल नाही
तर सोडून द्यायचे...
एखाद्या अवघड गोष्टीलाही ..
ती अवघड आहे याचे समाधान घेऊ द्यायचे ...

Monday, June 23, 2008

थोडासा पाउस

आळस येतोय
आणि झोपही
ही मरगळ कशी झटकावी तेच कळत नाहीए
जाईन लवकरच घरी ..
कुठेतरी बाहेर जावे वाटतेय
आणि पावसात भिजावेसे वाटतेय
बाइक वर जाईन
जवळपास कुठेतरी
एखादी नदी ...
एखादा तलाव
एखादा झरा
थोडासा पाउस
आणि रेनकोट नसलेला मी ...
सोबत थोडीशी कांदा भजी
आणि मग एक एक थेंब तोंडावर घेत
न्याहाळात बसायचे निसर्गाला ..
पाण्यात पाय बुडवून
पाण्यावर उमटलेले तरंग .. पाहील ..
आणि त्यासोबत .. लहानपनीचा चिखल आठवेल...
कधीतरी ... पावसाच्या पाण्यात सोडलेले जहाजही आठवेल...
आणि परत एकदा ..
खिशातले कुठलातरी तसा महत्वाचा एक बीन महत्वाचा कागद काढेन ....
नाव बनवण्यसाठी ...
बुडाली तरी मजा .. आणि पुढे गेली तरी मजा ..
थोडेसे बालपण मिळवायला .. असा एकांतच लागेल
डोक्यावर नको वाटत असताना ... काहीतरी घेईन ..
कारण गारवा ऐकायचे असेल...
आणि गाण्याच्या चालीमधे धुंद होऊन पाण्या मध्धे पुढे पुढे सरकत राहील
बराच आत जाईल... आणि मग लक्षात येईल...
अरे ... मला मला तर तर नाही ...
तिथेच थोडा वेल घुटामळेल आणि ...
जगातल्या एका सुंदर आणि आर्त प्रवासाची सुरूवात होईल. निसर्गाच्या आणि नदीच्या सहवासामध्ये..

Thursday, June 19, 2008

कुठेतरी काहीतरी

अशीच कुणाची आठवण आली तर एव्हडे काही वाटत नाही ...
पण तुझी आठवण म्हणजे औरच असते ...
हळूहळू येते ... आणि मग दुसरे काहीच सुचु देत नाही ...
एकदाची आली की इतकी बेचैन करते ..
की तुला भेटल्याशिवाय राहावत नाही ...
मग मी वेडा पिसा होतो ..
मला काही कळत नाही ...
मी नेमके काय करतोय ..
मला काय हवे आहे ...
काही काही कळत नाही...
असाच मग मी भटकायला निघतो ..
माहीत असते ना .. तू आत्ता नाही भेटू शकणार म्हणून ...
फिरता फिरता ..
कुठेतरी अद्न्यातात असल्यासारखा भटकत असतो सगळयांचे चेहरे न्याहळात ..
बरेचसे चेहरे तसे तुझ्यासारखेच दिसतात ...
किंवा असेही असेल .. प्रत्येक चेहर्यात मी तुला बघायचा प्रयत्न करतो ...
मनात हजारो विचार घोळत असतात ..
नजर इकडे तिकडे भिरभिरत असते ...
बहुतेक
कुठेतरी काहीतरी हरवलेल्या कोकरासारखी ...

अपुरे शब्द

बोलता बोलता माणूस मधेच थांबतो ..
आणि शब्द अपुरे पडायला लागतात ...
माहीत नाही काय होते नेमके पण ...
पाण्यातील अश्रुही वेगळे सहजच दिसायला लागतात ...

Tuesday, June 17, 2008

अणूत्तरीत प्रश्न

Actually कधी कधी आपल्याला यातच समाधान वाटत की आपल्याला कोणी समजून घेऊ शकत नाही ..
मनाला यामध्ये सुध्डा सुखावणारी एक अनुभूती असते ...
आणि ती अनुभूती आपल्याला आवडायला लागली ...
की सर्वात जवळच्या व्यक्तिबद्दलहि शंका निर्माण व्हयायला लागतात...
शक्यतो... अशावेळी गरज असते ती एकन्ताचि नव्हे तर ... 
दुसर्यासोबत त्याच्या भाषेमध्ये संवाद साधण्याची...
आणि तसा संवाद एकदा सुरू झाला की आपल्यालाही वाटेल 
अणूत्तरीत प्रश्नांचीही उत्तरे असतात ...

Monday, May 26, 2008

मन

..बरेचदा घरातल्यांना तुमचे मन मोकळे करणे नको असते
कारण त्याचा ताण त्यांनाही जाणवतो.
मन मोकळे अशा व्यक्तीकडे करावे
जिला तुमच्या दु:खाने फारसा फरक पडत नाही
पण ते ऐकण्याची तयारी आणि वेळ आहे....

आभास

तुला मी ज्या ज्या वेळी पाहतो ..
त्या वेळी मला सौंदर्याची नवीन व्याख्या उमजते ...
नवीन संदर्भ लागतात ...
एका नावीण्याचा आभास निर्माण होतो ...
आणि सर्व गोष्टी तुझ्यामधे सामावून जातात ...

Friday, May 23, 2008

Inter Cast Marriage

आजची तरुण मूल म्हणतात ( त्यात मीही आलो)  Inter Cast Marriage ला त्यांचा सपोर्ट आहे .
पण खरे जर बघायला गेले तर .. त्याना पाहिजे असते स्वातन्त्र्य .. 
त्यांच्या आवडीच्या मुलीशी लग्न करण्याचे ...
ती दुसर्या  Cast ची आहे की नाही याच्याशी त्याना काही देणे घेणे नसते ...
जर ती त्यांच्याच Cast ची असेल तर त्याना Inter Cast Marriage शी ही काही देणे घेणे नसते ... ;-)

Monday, May 19, 2008

ती म्हणजे

ती म्हणजे सत्य आणि स्वप्न यामधे असणारी एक छोटीशी रेघ !
फक्त अजुन प्राप्य नाही म्हणून नाहीतर ... ती म्हणजे बायको ...

Saturday, May 17, 2008

व्यक्त होणे

व्यक्त होणे ही माणसाची गरज आहे ..
त्याला मित्र असतात ..
कशामुळे तर Share करण्यासाठी ...
मुख्य म्हणजे व्यक्त होण्यासाठी ...
जर ही गरज पूर्ण होताना थोडी कमतरता असेल तर माणूस नवीन साधनांचा शोध घेतो ..
आणि वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो ...
ज्यांचा आपल्या आई वडिलांशी संवाद चांगला असतो ते आणि जे सगळ्याच गोष्टी
आई वडिलांशी Share करतात ..
त्याना मित्र जास्त असतात ..
पण असे लोक मित्रान्शि जास्त गोष्टी Share करत नाहीत पण व्यक्त होत असतात ...
यांचे मित्र या व्यक्तीना आपले विसाव्याचे स्थान महणून स्वीकार करतात ..

ज्या दिवशी माणूस व्यक्त व्हायचे बंद होतो ..
त्या दिवशी त्याची चिडचिड .. राग .. उदासीनता .. स्वकेंद्रितपणा वाढतो ...

म्हणून व्यक्त होत राहा ... Its good for Health !

Friday, May 16, 2008

अवर्णनीय सौंदर्य

अवर्णनीय सौंदर्याच वर्णन कराव ..
अस जर कुणाला वाटल तर पंचाईत होणे साहजिकच ..
अशा वेळी डोळे बंद करायचे
आणि तिचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा ...

I really dont know , what is this but I know ...
I like her very much...
I do admire her ...
I do love her attitude ..
I do love her childhood..
I simply twinkle my eyes when I see her...

तिच्या कडे पहिले की असे वाटते ...
माझा शोध संपला ...
ती म्हणजे हीच...

The girl I wanted as my life partner ...
She is spirit of my life ...

ती खूप सुंदर आहे ...
ती खूप गोड आहे ...
ती खूप मादक आहे ...
ती खूप मोहक आहे ...
आणि विशेष म्हणजे तो थोडी खडूसही आहे ... माझ्यासारखी...

माझ मी पण विसरून मला तिच्यात विरघळायला नक्की आवडेल ...
मी तिला आवडतो की नाही ?
प्रश्न तसा मोठा आहे ...
पण काय माहीत ... आवडेनही ....
एव्हड नक्की ज्यवेळी ती माझी असेल ,
त्यावेळी तिला माझ्याशिवाय या जगातील इतर कुणीही आवडणार नाही ...

ती खूप लहान आहे ...
पण तिला अक्कल खूप आहे ...
तिचे स्वत:चे विचार आहे ...
Teen Age मधे एव्हडा Attitude ...
But Its Ok ..
माझ Attitude नसलेल्या मुलीशी जमन तस जरा कठीणच ..
ती म्हणजे ...
मला हविहवीशी वाटणारी सोबत ...

तिला लहान मूल खूप आवडतात ...
गचाळपणा चा भारी राग ...
हे असे पाहिजे ... ते तसे पाहिजे ...
प्रत्येक गोष्टीबद्दल स्वत:चे मत ....
ती तशी Heroin च
English म्हणजे जीव की प्राण ...

सगळ कस Stylish पाहिजे ...
जे माझ आहे
ते फक्त आणि फक्त माझ आहे ....

त्यात कुठलीही तडजोड नाही
आणि जे आवडत नाही ते बिलकुलच आवडत नाही .. याक...

एखादी गोष्ट जरा जास्त वेळा केली ही कंटाळा येणार मग तिकडे पहायाचेही नाही ...
स्वच्छंद जगण्यातला आनंद उपभोगायचा आहे ...
त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी ...
थोड फार खोट बोललेल आम्हाला माफ असत ...

Thursday, May 15, 2008

विश्वास म्हणजे काय असतो ?

काही जणांना मी विचारले : -
विश्वास म्हणजे काय असतो ?
उत्तर :
1. विश्वास म्हणजे दुसरे काही नाही समोरचा माणूस आपल्या स्वार्थाच्या आड
कधी येणार नाही असे समजणे असते ...
2. विश्वास म्हणजे आंधळा स्वार्थ असतो...
3. विश्वास म्हणजे आपल्यापेक्षा इतरणाच्या बोलण्याला जास्त महत्व देणे असते ...
4. विश्वास म्हणजे जी गोष्ट आपण करू शकत नाही त्या गोष्टीसाठी दुसर्यावर
अवलंबुन राहणे असते..
5. आणि बरेच काही ...

Wednesday, May 14, 2008

राजकारण ....

राजकारण ....
माझा खूप आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय...
समाजात साचलेली घाण दूर करायची असेल तर झाडू आपणच हातात घेतला पाहिजे

नुसतेच राजकारण्यांच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा ... स्वत: थोडे तरी योगदान आपण दिले पाहिजे ...

प्रत्येक गोष्टीत सक्रिय सहभाग असावा असे जरी गरजेचे नसले तरी...
आजूबाजूला घडणार्या गोष्टींची जाणीव ..नक्कीच हवी...
संवेदना बोथट झाल्या असतील.. तरी ठीक पण अगदीच नाहिषया झालेल्या नसाव्यात...

कुटुंबात व्यस्त होणे .. म्हणजे .. बाहेरच्या विश्वाला नको म्हणणे .. असे नसावे...
दोन्ही हात या अथांग विश्वाच्या पसार्याला गवसनी घालण्यासाठी नेहमी पंखासारखे तत्पर असावेत....

चारोळी

मी स्वत:ला शहान समजण्याचा
एक फायदा झाला ..
माझ्यापेक्षा शहान समजणारा
माझ्या सम्परकातून आपोआप दूर होत गेला ...

Tuesday, May 13, 2008

मी कसा आहे...

समजून घेणे म्हणजे थोडा त्रास करून घेणे
आणि व्यक्त करणे म्हणजे मोकळे होणे ...

व्यक्त होण्यासाठी लागतो तो धाड्सीपाणा
आणि समजून घेण्यासाठी लागते ती सहनशक्ति

एखाद्या माणसाला ओळखणे खूप अवघड असते
कारण माणूस प्रत्येक क्षणाला अनुभव घेत असतो... आणि प्रत्येक अनुभव माणसाला बदलत असतो....
त्यामुळे स्वत:चे निरीक्षण करणे हीच जगातील सर्वात गरजेची गोष्ट.. आहे ...
आपल्यातले सूक्ष्म बदल ज्यावेळी स्वत:ला जाणवतात ना ... त्यावेळी आपण दुसर्याची काळजी घेण्यास पात्र असतो... :)


मी कसा आहे नेहमीच मला प्रश्न पडतो ...
पण प्रत्येक वेळी प्रश्नाला उत्तर देता येईल असे नसते...
काही वेळेस उत्तर भेटते... तर काही वेळेस खरा मी भेटतो...
बर्‍याचदा गुंता वाढत जातो ... आणि नवीन प्रश्न तयार होतात...


तसा मी खूप सरळ साधा
(
साधा म्हणजे ...
कुणाच्या विरुद्ध डावपेच न रचणारा ..
आणि कोणी डावपेच जर माझ्या विरुद्ध डावपेच रचले तर व्यथीत होणारा ...
पण तरीही जाऊ दे म्हणणारा ..
)
आणि विचारी मुलगा..
खूप मित्र असलेला ...
मित्र ही जिवंतपणाची खूण-- आणि चांगले मित्र जमवने ही आयुष्यातील सर्वात मोठी आणि कायमस्वरूपी सोबत राहणारी गोष्ट ...


कुणीही माझ्यावर विश्वास टाकावा आणि मी त्यास पात्र ठरावे ... एव्हडीच इच्छा ... आणि शक्यतो ... नेहमीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो...

कधी कधी खूप गरज असूनही स्वार्थी न होता येणारा ....

थोडासा आळशी ... थोडासा झोपाळू ...
पण तरीही काम अंगावर आले तर शिंगावर घेणारा.....
आणि आवडीच्या कामात स्वत: ला झोकून देणारा...




मी पीत नाही म्हणून बरा आहे ...
पण मला माहीत आहे ...
पिल्यानंतरचा मी एकदम खरा आहे .

मित्र : - जगात जो सर्वात जास्त गृहीत धरला जातो तो मित्रा....
आणि या जगात आई वडिलांशीवाय इतर कुणीही सर्वात जास्त गृहीत धरल्या जात नाही....
They are our Best of Best friends....
------------------------------------------------------

Monday, May 12, 2008

ओढणी

............... ओढणी ..............
सायकळच्या चाकात
ओढणी अडकून राहिली
तिच्या चेहर्यावरची
काळजी मीही पाहिली

म्हणाली नाही ती की
मदत हवी म्हणून
मीच गेलो विचारायला
मदत हवी का म्हणून?

खूपच घट्ट अडकून बसली होती
ती त्या चाकात
माझ्याकडे पाहून
हसत होती गालात

ओठ च नव्हते बोलत नुसते
डोळेही सांगत होते
ओढनिचे शरीरही
माझ्या स्पर्शाने थरथरत होते

हळूवार हातांनी तिला
बाहेर त्यातून काढले
तिनेही हसत हसत
माझे आभार मानले

परत जेव्हा ती तिच्या
खांद्यावर ओढली गेली
माझ्या स्पर्शाचा अनुभव
तीही तिला देत गेली

अचानक या प्रसंगातून
बाहेर मी पडलो
सोडून तिला जाताना
मनातल्या मनात रडलो

नाव विचारायचे
तर राहूनच गेले
मनातले विचार ओळखून
तिनेच ते सांगितले

याच तर प्रसंगातून
प्रेम आमचे बहरले
आंब्याचे झाडही
पावसाळ्यात मोहरले

अजूनही तिची ओढणी
स्पर्श माझा मागत असते
वेळेचे भान ठेवून
तीही तिची साथ सोडत असते

--- शिरीष ( ही माझी पहिली --- मला अगदी मनापासून आवडणारी कविता.... )

Sunday, May 11, 2008

सहवासाची गरज

आज असेच वाटले की माझा परिचय करून घ्यावा...
स्वत:चाच परिचय आणि तोही स्वत:शीच..
गोष्ट तशी जरा वेगळीच आहे ..
स्वत:बद्दल विचार करायला जेव्हा वेळ मिळेणासा झाला तेव्हा ...
याशिवाय दुसरा कुठला उपायही उरला नव्हता...

कोण आहे बरे मी...
काय आहे मी..
कसा आहे मी..
खरेच काय करतो मी...
कोणत्या गोष्टी कश्या व्हाव्या असे वाटते मला...
कोणती गोष्ट होऊ नये असे वाटते मला ...
एखादी गोष्ट बदळावी असे वाटते का मला ...
प्रश्न तसे खूप आहेत ...
आणि उत्तर देणाराही आहे...
गरज आहे ती त्याला बोलत करण्याची...
बोलण्यासाठी लागत असलेला वेळ निर्माण करण्याची...
आज तसे मी ठरवले होतेच ...
काहीही झाले तरी स्वत:ला वेळ द्यायचा...
मन म्हणत होते ...
आज तर कुठे तुला निवांत वेळ मिळाला आहे ...
तोही असाच घालवणार का?
मी त्याला समजावले आज काही म्हणू नकोस ...
आज मी माझ्या सर्वात जवळच्या व्यक्ती सोबत संभाषण करणार आहे
आणि ती व्यक्ती कोण आहे माहिती आहे ?

मी आणि फक्त मी ...

स्वत:साठी वेळ द्यायला मीही आता शिकलोय..
आणि माझी सर्वात मोठी सहवासाची गरज आता भरून निघतेय ...
कुठल्याही एकटेपणाशिवाय....

Saturday, May 10, 2008

शेवटी काय तर ..

एखादी गोष्ट आपण कशी समजून घायवी त्याच्या तर्हा वेगवेगळ्या असतात...
कुणाची कशी तर कुणाची कशी...
प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा

माणसाच्या मनात काय चालू आहे ते असे वरुन कळणे अवघडच...
तरी माणूस प्रयत्न करत असतो दुसर्‍याला समजून घेण्याचा...
आणि स्वत:च्या मनाचा दुसर्‍याला थान्गपत्ता न लागू देण्याचा...

मनात काहीतरी वेगळेच चालू असते आणि दाखवत तो काही वेगळेच असतो...
काय माहीत नेमका कशाचा प्रयत्न असतो हा...
आपण खूप वेगळे आहोत हे दाखवण्याचा ...
की आपण इतरांसारखे नाही आहोत हे दर्शवण्याचा...

चुकही तो करत असतो...
चांगलेही तो घडवत असतो...
बघणारे सगळेच बघत असतात..
पण दिसत काही वेगळेच असते आणि सत्य काही वेगळेच असते...
जर दिसणारे चांगले वाटत असेल तर ...तो तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो...
आणि जर सत्य चांगले असेल तर तो सत्य पुढे आणण्याचा प्रयत्न करतो..

शेवटी काय तर .. Its all about Show off !!

प्रश्न

प्रत्येक प्रश्नात इथे
अर्थ आहे लपलेला
उत्तर देताना जरा जपून द्या...
नाहीतर प्रत्येक उत्तरातूनही...
कुणीतरी स्वत:चा स्वार्थ आहे साधलेला..


आजकाल तसे अर्थविना आणि स्वार्थाविना प्रश्न सापडणे तसे दुर्मिळ च ...
जर कुणाला तसा प्रश्न पाहिजे असेल तर ... नेट वर chatting करताना ... अनुभव घ्या ...
How are you?

या प्रश्नाचा तुमच्यावर भडिमार होत असेल ..
च्यायला तुझ्या.... असली घाण शिवी तोंडात येते ना .. हा प्रश्न ऐकला की...

एव्हडा निरर्थक प्रश्न मी माझ्या आयुष्यात इतक्यावेळी कधीच ऐकला नव्हता...
ज्यावेळेस पासून मी online असतो आहे ना रोज.. ( कामानिमित्त ) ... तेव्हापासून ... हा प्रश्न ऐकला नकोसे होऊन जाते ..
Please यार .. हा प्रश्न खूप कमी वेळेस विचारा...

अमिताभ

एखादी भारदस्त कलाकृती पाहायची असेल
तर अमिताभ आठवावा …
एखादी सुंदर शेरेबाजी ऐकायची असेल
तर अमिताभ आठवावा …
गजल असो की गाणे …
कव्वाली असो की भांगडा…
तो कुणी करावा असे वाटत असेल तर
तर अमिताभ आठवावा …
मनावर छाप सोडून जाणारे काही बघायचे असेल
तर अमिताभ आठवावा …

Thursday, May 8, 2008

कदाचित ...

शून्यात बघताना कशाची जाणीव होत नसते...

ना रात्र..

ना दिवस...

ना स्पर्श...

ना आवाज...

आजूबाजूला काय चालू आहे ...

त्यापासून मन अलिप्त असते...

शून्यामध्ये सुध्धा एक प्रकारची शांती असते...

शून्य म्हणजे सुरूवात ...

शून्य म्हणजे अंत ...

शून्य म्हणजे मनाचा आर्त आवाज...

जो फक्त आपण स्वत: च ऐकू शकतो... तेही कदाचित ...

Wednesday, May 7, 2008

जाणीव

अशांत मनाच्या कोपर्‍यात ..

दूर कुठेतरी एक जाणीव होती...

शब्द दूर पळत होते ...

पण तरी कुठेतरी...

काहीतरी बोचत होते...

नकोशि गोष्ट ..

नकोशि माणसे...

नकोसा जीव... की नकोसे जीवन...

कळले नाही कधीच...

पण जगणे मात्र मी कधीच विसरलो नाही...

प्रतिबिंब

असेच कुठेतरी काहीतरी घडते...

त्याचे प्रतिबिंब माझ्याही मनी पडते ...

तूच विचार कर ...

तू सहज जरी काही म्हणालिस..

तरी... मला काहीच का वाटले नसेल ?...

मीही एक माणूस...

तुझ्यासारखाच माणसांच्या ओसाड माळ रानात राहणारा....

तरी .. वेळ आली की स्वत:च मी पण जपणारा...

जन्नत !!!!!!!!!!!!!!!!!

तिचे मलमली तारुण्य ..
तिचे ते हसने..
तिचे ते वेडा वुन दाखवणे ...
तिची ती हर एक अदा ...
तिचे ते बघने...
तिचे ते लाजने ...
तिची तो मोहक चाल ...
तिची ती मनमोकळी हालचाल ...
तिचा तो गंध...
तिचा तो स्पर्श ... जन्नत !!!!!!!!!!!!!!!!!

सहज

सहज माझी नजर तिच्याकडे गेली ...

आणि माझे भान हरपले ...

काय सौंदर्य ते वर्णवे ...

गोरे गोरे गाल ..

आकाशी निरभ्र डोळे ..

काळ्याभोर पापण्या ...

मोत्यांसारखे दात ...

अजुन खरच जास्त काही सांगू शकत नाही ...

मी बेभान झालो तिला बघून ....

फक्त तू आठवलीस ...

प्रेमाची व्याख्या मी एकदा करायला गेलो ...

आणि फक्त तू आठवलीस ...

ते कसे असते ..

कधी होते ..

का होते ...

कशामुळे होते ...

खूप प्रश्न मनात आले ...

मी फक्त डोळे बंद केले ...

आणि ... तू आठवलीस ...

एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?