Monday, October 20, 2008

राजला एक पत्र ...

राज ..

राज .. तू एक नंबर माणूस आहेस ... तू मनाने आणि चारित्र्याणे स्वच्छ आहेस .. जे वाटते ते बोलतोस म्हणून आम्हाला आवडतोस ...
आज माझ्यासाठी ( मराठी माणसासाठी ) भांड्ताना ... तुला अटक व्हावे लागतेय म्हणून मला जे वाटले ते लिहितोय ...
तू जो मार्ग निवडला आहेस .. तो सर्वाना स्वीकारण्यासारखा नाहीए .. असे मला राहून राहून वाटते ...
तुला अटक झाली याचा अर्थ .. असा नाही होत .. की अन्याय झाला ..
याचा अर्थ एव्हडाच .. न्याय देवतेने तुला कान पकडून स्वत:समोर उभे केले आहे ...
आणि मराठी माणसांनो एक लक्षात ठेवा.. आपला नेता जर चुकत असेल तर त्याला समजवणारा कायद्याशिवाय इतर कुणीही असु शकत नाही ...
आणि मला नाही वाटत .. इतर कुठल्या नेत्यामधे .. अण्णा हजारेन्शिवाय .. राज चुकतोय तर काय केले पाहिजे हे सांगण्याचे कर्तुत्व आहे ...
तू चुकतोय की नाही हा मुद्दा गौण ... पण किमान आपल्या मुद्द्याचे समर्थन करण्याची रीत जर बदलली नाही
तर .. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागतील .. सततचे अराजक .. म्हणजे मराठी माणसाचा विजय .. नव्हे ...
मराठी पाट्या ... नसतील तर .. अराजक ...
यु पी बिहारी वाले असतील तर अराजक...
अरे चाललेय काय माझ्या देशात ...
माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र बनवायचा असेल तर आपल्याला सौम्य व्हावेच लागेल ...
टिळकांनी आणि सावरकरांनी आपल्या आपल्यातच भांडण्यासाठी स्वातंत्र्य नाही मिळवून दिले ...

माझ्या महाराष्ट्रातील बसेस आणि सार्वजनिक मालमत्ता ... आपण केलेल्या आधीच्या चुकांचा राग करण्यासाठी बनवल्या नाहीयेत राज...
ज्याहि वेळी मी 1 दिवस काम करतो त्यातील 20 % सरकार घेते .. आणि त्यातून ही मालमत्ता उभी राहते ... नसेल पुरेशी ती अजुन ...
पण आहे .. आणि जेव्हडी आहे त्यातून जनतेचे नसल्यापेक्षा बरेच प्रश्न कमी झाले आहेत ...

जनतेला मी आवाहन करतो .. की राजचे समर्थन करताना ... एकाही सरकारी मालमत्तेचे नुकसान करू नये ...
सरकार भलेही राजच्या विरोधात असेल .. पण न्यायालय कधीच नसेल ... न्यायालय अशा गोष्टीमध्ये आपल्याला मार्ग दाखवण्याचे काम करेल ... आणि आपण जर न्यायव्यवस्था नाकारत असु तर ... माहीत नाही पुढे काय काय वाढून ठेवले आहे .. ...
आपल्या अशा क्रियांमुळे जर कुणी त्यावर प्रतिक्रिया दिली आणि वाद वाढत गेले तर पुढे याशिवाय अजुन काही वेगळे घडणार नाही .. मग फक्त बघत बसायचे ...
होणारी दंगल .. तोडफ़ोड .. जाळपोळ ... हयामधे कुणीही असु शकते ... मी ... तुम्ही .. आपली आई .. बहीण ... म्हातारे बाबा ... आजी...


मी तुझ्यासोबत आहे राज ...
तुझाच शिरीष
( तुझाच एव्हड्या साठी .. की तू मला सर्वात जास्त आवडणारी राजकीय व्यक्ती आहेस )

1 comments:

Abhijeet Sawant said...

छान लिहले आहेस ..
माजे पण हेच मत आहे ..
सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून काहीच साध्य होणार नाही ...
यात शेवटी आपलेच नुकसान आहे...
आजच ४ ५ PMT फोडल्या आहेत
राजचे समर्थन जरुर करावे पण ह्या मार्गाने नव्हे ...

एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?