Monday, June 30, 2008

समाधान

कधी काही कळल नाही
तर सोडून द्यायचे...
एखाद्या अवघड गोष्टीलाही ..
ती अवघड आहे याचे समाधान घेऊ द्यायचे ...

Monday, June 23, 2008

थोडासा पाउस

आळस येतोय
आणि झोपही
ही मरगळ कशी झटकावी तेच कळत नाहीए
जाईन लवकरच घरी ..
कुठेतरी बाहेर जावे वाटतेय
आणि पावसात भिजावेसे वाटतेय
बाइक वर जाईन
जवळपास कुठेतरी
एखादी नदी ...
एखादा तलाव
एखादा झरा
थोडासा पाउस
आणि रेनकोट नसलेला मी ...
सोबत थोडीशी कांदा भजी
आणि मग एक एक थेंब तोंडावर घेत
न्याहाळात बसायचे निसर्गाला ..
पाण्यात पाय बुडवून
पाण्यावर उमटलेले तरंग .. पाहील ..
आणि त्यासोबत .. लहानपनीचा चिखल आठवेल...
कधीतरी ... पावसाच्या पाण्यात सोडलेले जहाजही आठवेल...
आणि परत एकदा ..
खिशातले कुठलातरी तसा महत्वाचा एक बीन महत्वाचा कागद काढेन ....
नाव बनवण्यसाठी ...
बुडाली तरी मजा .. आणि पुढे गेली तरी मजा ..
थोडेसे बालपण मिळवायला .. असा एकांतच लागेल
डोक्यावर नको वाटत असताना ... काहीतरी घेईन ..
कारण गारवा ऐकायचे असेल...
आणि गाण्याच्या चालीमधे धुंद होऊन पाण्या मध्धे पुढे पुढे सरकत राहील
बराच आत जाईल... आणि मग लक्षात येईल...
अरे ... मला मला तर तर नाही ...
तिथेच थोडा वेल घुटामळेल आणि ...
जगातल्या एका सुंदर आणि आर्त प्रवासाची सुरूवात होईल. निसर्गाच्या आणि नदीच्या सहवासामध्ये..

Thursday, June 19, 2008

कुठेतरी काहीतरी

अशीच कुणाची आठवण आली तर एव्हडे काही वाटत नाही ...
पण तुझी आठवण म्हणजे औरच असते ...
हळूहळू येते ... आणि मग दुसरे काहीच सुचु देत नाही ...
एकदाची आली की इतकी बेचैन करते ..
की तुला भेटल्याशिवाय राहावत नाही ...
मग मी वेडा पिसा होतो ..
मला काही कळत नाही ...
मी नेमके काय करतोय ..
मला काय हवे आहे ...
काही काही कळत नाही...
असाच मग मी भटकायला निघतो ..
माहीत असते ना .. तू आत्ता नाही भेटू शकणार म्हणून ...
फिरता फिरता ..
कुठेतरी अद्न्यातात असल्यासारखा भटकत असतो सगळयांचे चेहरे न्याहळात ..
बरेचसे चेहरे तसे तुझ्यासारखेच दिसतात ...
किंवा असेही असेल .. प्रत्येक चेहर्यात मी तुला बघायचा प्रयत्न करतो ...
मनात हजारो विचार घोळत असतात ..
नजर इकडे तिकडे भिरभिरत असते ...
बहुतेक
कुठेतरी काहीतरी हरवलेल्या कोकरासारखी ...

अपुरे शब्द

बोलता बोलता माणूस मधेच थांबतो ..
आणि शब्द अपुरे पडायला लागतात ...
माहीत नाही काय होते नेमके पण ...
पाण्यातील अश्रुही वेगळे सहजच दिसायला लागतात ...

Tuesday, June 17, 2008

अणूत्तरीत प्रश्न

Actually कधी कधी आपल्याला यातच समाधान वाटत की आपल्याला कोणी समजून घेऊ शकत नाही ..
मनाला यामध्ये सुध्डा सुखावणारी एक अनुभूती असते ...
आणि ती अनुभूती आपल्याला आवडायला लागली ...
की सर्वात जवळच्या व्यक्तिबद्दलहि शंका निर्माण व्हयायला लागतात...
शक्यतो... अशावेळी गरज असते ती एकन्ताचि नव्हे तर ... 
दुसर्यासोबत त्याच्या भाषेमध्ये संवाद साधण्याची...
आणि तसा संवाद एकदा सुरू झाला की आपल्यालाही वाटेल 
अणूत्तरीत प्रश्नांचीही उत्तरे असतात ...
एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?