Wednesday, January 21, 2009

एका ट्रेन ची गोष्ट

एक गोष्ट सांगतोय ...

नीट लक्ष देऊन ऐका आणि निर्णय घ्या ...
तुमची निर्णयक्षमता तपासण्यासाठी ही गोष्ट नक्की उपयोगी पडेल ...

एकदा काही मुले रेलवे ट्रॅक वर खेळत होती .. तिथे 2 ट्रॅक होते ... एक
असा जो .. जो वापरात नाहीए .. नि दुसरा असा .. जो सध्या वापरला जातो
आहे...

त्यात फक्त एकच लहान मुलगा वापरात नसलेल्या ट्रॅक वर खेळत होता .. बाकीचे
सगळे चालू ट्रॅक वर खेळत होते ....

नेमकी त्यावेळी ट्रेन आली ... आणि तुमची ड्यूटी ट्रॅक बदलण्याच्या जागी आहे ...
अशावेळी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे ...
तुम्ही ट्रॅक बदलू शकता ... आणि सगळ्या मुलांना वाचवू शकता ... एका लहान
मुलाचा बळी देऊन ...

किंवा ... ट्रेन ला आपल्या मार्गाने जाऊ देऊ शकता ... ...

>>
क्षणभर विचार करूया ...


>>
निर्णय तर घ्यायचा आहे ...


>>
आता पुढे वाचा ...


>>
बहुदा .. बरेच जण त्या लहान मुलाला सॅक्रिफाइस करायचा निर्णय घेतील ...
नैतीकतेने आणि भावनाशिलपणे

पण तुम्ही जर नीट विचार केला .. तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील ...

1 . ज्या मुलाचा तुम्ही बळी देत आहात .. त्याने खूप योग्य निर्णय घेतला
होता ... सुरक्षित जागी खेळण्याचा ...
2. आणि त्याचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे त्याच्या अशा
मित्रांमुळे ज्यांनी माहीत असूनही ... धोक्याच्या ठिकाणी खेळणे निवडले
...
3. अशा प्रकारची दुविधा स्थिती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते ऑफीस मधे ...
समाजामधे .. राजकारणामधे ... मुख्यत्वे लोकशाही प्रक्रियेमधे ... जिथे
योग्य माणसाचा बळी दिला जातो .. कारण अयोग्य माणसांचे संख्याबळ जास्त
असते ...
4. एक तर त्याचा बळी दिल्या जाईल आणि एकही अश्रूचा थेंब कुणाच्याही
डोळ्यातून बाहेर येणार नाही त्याच्यासाठी

****************************************************************************************
योग्य निर्णय हाच आहे ... की ट्रॅक बदलू नये ....

>>कारण .. त्या ट्रॅकवर खेळणारी मुळे कदाचित सावध असतील .. आणि ते पळू शकतील...

>>पण ह्या वापरात नसलेल्या ट्रॅक वर ट्रेन येईल असा विचारसुध्डा त्या लहान मुलाच्या मनाला शिवनार नाही ... आणि मग जे होईल ते अटळ असेल ...

>>आणि तो ट्रॅक वापरात नसायचे कारण देखील हे असु शकेल की .. तो मुळातच धोकादायक आहे .... आणि अशा धोकादायक ट्रॅक वर ट्रेन चालवुन आपण हजारो प्रवाश्यांचा जीवही विनाकारण धोक्यात टाकत आहोत ...

एक गोष्ट लक्षात ठेवावी ...

जे बरोबर आहे कदाचित ते लोकप्रिय नसेल...
पण जे लोकप्रिय आहे ते नेहमीच बरोबर आहे असे नसते ...

शिरीष जांभोरकर

एका ट्रेनची गोष्ट

Tuesday, January 20, 2009

चुकीची गोष्ट

अशी कुठलीही चुकीची गोष्ट नसते ... जी बरोबर गोष्टीने दुरुस्त केली जाऊ
शकत नाही ...
एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?