Monday, March 30, 2009

दंगल

सर्वात जास्त तीव्रतेने आवडणारी गोष्ट एकट्या माणसाकडूनही दंगल घडवण्याची क्षमता ठेवते ...

समजूतदार व्यक्ती

समजूतदार व्यक्ती स्वत:ला बदलवू शकते आणि बदलते .. जसे जग आहे त्याप्रमाणे ... आणि इतर व्यक्ती प्रयत्न करत राहतात .. जगाने बद्लावे ह्यासाठी ... खरी प्रगती त्यांच्याकडुनच होते ...  जे जग बदलण्यासाठी प्रयत्न करत रहातात ...

Sunday, March 29, 2009

लोकशाही म्हणजे एक प्रक्रिया

लोकशाही म्हणजे एक प्रक्रिया .. ज्यामधे ... आपण तत्पर असतो अशी व्यक्ती निवडण्यासाठी .. जिच्यावर ... सगळ्या चुकांची जबाबदारी टाकता येईल...

Thursday, March 12, 2009

शिवाजी महाराज - आज त्यांची जयंती ..

बाबा आपल्या 5 वर्षाच्या निरागस मुलाला  सांगत होते ..
शिवाजी महाराज किती शूर आणि पराक्रमी होते आज त्यांची जयंती ..
त्यांच्याकडे  खूप अश्या गोष्टी आहेत ज्यातुन आपल्याला खूप काही शिकता येईल ...
 
आणि छोटु म्हणाला  .. बाबा बाबा ss .. काल रात्री किनई शिवाजी महाराज माझ्या स्वप्नात आले होते ..
नि काय म्हणाले माहितेय ... मलाही तुझ्यासारखे होता येईल का रे ?
ssssss नि छोटु आनंदाने उड्या मारत खेळायला  पळाला ...

व्यर्थ

कुणा दुसर्‍या सारखे  व्हावे वाटणे म्हणजे तुम्ही जे आहात ते व्यर्थ असणे होय ...

Tuesday, March 10, 2009

होळी

दुसर्‍याच्या रंगामधे रंगून जाणे .. हे तसे फार अवघड नसते ... गरज असते ती फक्त .. समर्पणाची   ...

शिमग्याच्या हार्दिक शुभेछ्या

रंगांशी मैत्री म्हणजे निसर्गाला आवाहन ... प्रत्येक सजीवाला ... तुझ्या सारखी नितळ हिरवळ लाभावी असे ..

Thursday, March 5, 2009

अस्वीकार

खळखळणारी  नदी स्वच्छ असायचे कारणच  हे असते ,
की  ती तिच्या मधल्या पाण्याचे परिवर्तन स्वीकारते ...
नवीन पाण्याचा अस्वीकार ज्यावेळी ती करू लागेल ..
त्यावेळी तिचे डबक्यात  रुपांतर होण्यासा उशीर लागणार नाही
एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?