These are the Reflections of my mind ....
What ever comes in it and I feel that its worthy to tell to the world ... it reflects in this blog ....
-- Shirish Jambhorkar
मलाच मी न कळलेला असा मी वेगळा कसा आहे नेहमीच मला प्रश्न पडतो ... पण प्रत्येक वेळी प्रश्नाला उत्तर देता येईल असे नसते... काही वेळेस उत्तर भेटते... तर काही वेळेस खरा मी भेटतो... बर्या चदा गुंता वाढत जातो ... आणि नवीन प्रश्न तयार होतात...
तसा मी खूप सरळ साधा (साधा म्हणजे ... कुणाच्या विरुद्ध डावपेच न रचणारा .. आणि कोणी जर माझ्या विरुद्ध डावपेच रचले तर व्यथीत होणारा ... पण तरीही जाऊ दे म्हणणारा ..) आणि विचारी.. खूप मित्र असलेला ... मित्र ही जिवंतपणाची खूण-- आणि चांगले मित्र जमवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी आणि कायमस्वरूपी सोबत राहणारी गोष्ट ... कुणीही माझ्यावर विश्वास टाकावा आणि मी त्यास पात्र ठरावे ... एवढीच माझी इच्छा ... आणि शक्यतो ... नेहमीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो... कधी कधी खूप गरज असूनही स्वार्थी न होता येणारा .... थोडासा आळशी .............. पण तरीही काम अंगावर आले तर शिंगावर घेणारा..... आणि आवडीच्या कामात स्वत:ला झोकून देणारा…