Monday, December 24, 2007

कधी कधी मीही बरोबर असतो

कधी कधी मीही बरोबर असतो...
पण कुणालाच कळ नाही....

प्रत्येकाचा निष्कर्ष वेगळा...
प्रत्येकाचा संदर्भ वेगळा...

खरे स्वत:चेच असते असेच सगळे समजतात....


कधी कधी तेही बरोबर असतात...
पण कुणालाच कळ नाही....

Friday, July 6, 2007

स्वराज्य

प्रकाशाच्या राज्यात आहे
नुसता काळोख साचलेला.....

बासरीच्या सुर्णाचा येथे
कंठ दाटलेला....

शबद्वीन कवितांचा
ओघ आटलेला....

म्हाणती नुसते स्वराज्य येथे....
पण त्याचाही ... ध्वज फाटलेला.....

सावली

सावलीचा सहवास
म्हणजे ...एक दिव्या प्रवास....
संपणारी सोबत ...
आणि आखंड बडबड ...स्वत:चीच स्वत:शी चाललेली

कुणीही सोबत नसेल
तरी ही मात्र असेल.....
कुठेही ... कधीही....
अगदी शेवटच्या वेळीही..........


सोबत म्हणजे काय ते ती शिकवते
अंधाराच्या राज्यात पुसट होऊन
तर प्रकाशाच्या साम्राज्यात नितळ होऊन ...

मलाही वाटते ..आता मला गरज आहे
अशाच सोबतीची
मी असणार असलो एकटा तरी
कुणीतरी सोबत आहे या आभासाची.....

Thursday, July 5, 2007

नाव

Party होती दारूची
आणि तिथे मात्र पुजारी गटवला ....
लगनमाधे नाव घेता घेता ...
अजुन एक पटवला ....

Wednesday, July 4, 2007

मी

जाणार सखे तू कुठे
मी तर नेहमीच इथे उभा असेन
भरारी घेऊन पहा
सार्‍या आसमंतात मीच दिसेन ....

मी

जन्मलो मी...
जगतोय मी...
रडतोय मी...
हसतोय मी...
खरे सांगू.... माझा मलाच शोधतोय मी...

आयुष्य

मनाची तगमग ... कधी कधी सहन होत नाही
कधी काही तर कधी काही
नुसत्याच जखमा....
आता तर ... मी मनाला मी समजावणेही सोडून दिलेय...
जेव्हापासून ती सोबत नाही....
जखमा कश्या भरतात .. तेही मन विसरून गेलेय.....
आणि मीही शिकलोय...
जखमा वागवत ... एखाद्या सैनिकासारखा .. आयुष्याशी लढायला ....

आठवण

अजूनही मन तिला आठवत असते...
कधी गर्दीत ... तर कधी एकाकी...
स्वप्न पडते तेही तिचे...
आठवणी येतात त्याही तिच्या ....
वारा जातो अंगावरून ... तर स्पर्श देतो तोही तिचा....
सगळे कसे... तिच्या पासून सुरू...
आणि तिच्यापर्यंत संपून जाते....
कधी कधी मन मात्र ... एकटे असताना... फक्त तिलाच आठवत राहते.... तिलाच आठवत राहते...

दैव

दुर्दैव माझे ... की सुदैव तिचे ,...
कुणालाच कधी कळले नाही
सोडून गेली ती मजला तरीही ...
चाचपडने मात्र कधी मीही सोडले नाही

मोरपिस

आषाढाच्या वणव्यात....
सर्वांग शहारून गेले...
स्पर्श तिने मज असा केला ...
जणू मोरपिस स्पर्शून गेले...

ती

संपल्या सगळ्या व्यथा ...
झुगारली सगळी बंधने ....
शोध घ्यायचा होता ...तिचा ...
आणि उमगलो मीच मला....

कारण

विनाकारण शब्द त्रास देतात कधी...
कधी तर फुलेही बोचू लागतात....
कारण असते वेगळेच ...
आणि ..आपलेच परके वाटू लागतात....

गोंधळते मन कधी...
आणि कारणेही विनाकारण वाटू लागतात...

Monday, June 25, 2007

Ajun Ek Naav

मनातले सगळ प्रेम
ठेवलय फक्त हिच्यासाठी राखून....
खुबाईच नाव घेतो
मी तिचा ढेकून

Wednesday, June 13, 2007

Past

आयुष्याकडून काही मागायला गेलो...
तेव्हा सगळ्याच गोष्टी हजर होत्या...
आणि मला उपाशी काढलेली ती संध्याकाल आठवली....

Tuesday, June 12, 2007

Thoughts

विचारांचे ओझे एके दिवशी ...
जरा जास्तच झाले ...
कुठेतरी दूर... एक कॉम्प्यूटर रिस्टारट झाले...

Monday, June 11, 2007

Sadashiv Peth Pune

ढेकनाचा जन्मा घ्यायचा होता ...
पण चुकुन माणूस झालो...
म्हणूनच की काय...
पेठेतला जावई झालो

Thursday, June 7, 2007

Aayushya

मी पुढे आणि आयुष्य मागे....
शर्यत मस्त रंगात आली....

अचानक मी नौकरीला लागलो ...

आणि....

आयुष्य आता पुढे निघून गेले आहे...
मी झगडतोय अजुन... माझे ते बालपण मिळवण्यासाठी....

Monday, June 4, 2007

Paryavaran

जमिनींचे भाव वाढले म्हणून बिल्डारांच फावल.....
आणि पर्यावरण वाचवायच म्हणून मीही फ्लॅटमध्ये एक बोनसाय लावल.....

Friday, June 1, 2007

Peene...

मी पीत नाही म्हणून बरा आहे ...
पण मला माहीत आहे ...
पिल्यानंतरचा मी एकदम खरा आहे .

--शिरीष
एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?