Friday, August 29, 2008

पंख

फुलपाखरांसारखे उडायला मलाही जमले असते ...
भीती वाटली ती चूरगाळले जाण्याची....
माझे मन हळूच मला कानात म्हणाले ,
" पंख असूनही भरारी घेण्याची वाट पाहत आहेस ...
तुझा देश आणि आणि तुझे देशवासीय एका नेत्याची वाट पाहत आहेत ... "

हायकू

रंगानाही गंध जेव्हा यायला लागला ...
पाण्यामध्येही आसमंत जिवंत व्हायला लागला...

Thursday, August 21, 2008

माणसे प्रश्न कधी विचारतात?

माणसे प्रश्न कधी विचारतात... तर त्यातून त्यांना काहीतरी हवे असते ...
कधी उत्तर माहीत असते ...
तर कधी उत्तरा नंतर होणारा संभ्रम माहीत असतो...
प्रत्येक प्रश्नातुन काही नाही काही जे विचारले नाही ते जाणून घ्यायची अलिप्त इच्छा असते ...
जर ती पूर्ण झाली ... तर माणूस तृप्त होतो... अगदी मनासारखे उत्तर भेटल्यासारखा....

Wednesday, August 20, 2008

जाने तू या जाने ना - एक प्रश्न ..

काल जाने तू या जाने ना चे ... कभी कभी आदिती ... गाणे बघत होतो....
छान वाटत होते ... एकदम सुरेल गाणे ... त्यातल्या भाव भावना .. संवेदना ... आणि बरेच काही ....
एका ठिकाणी अचानक मन अडकले... .थबकले .. आणि थोडे कासावीस झाले ...
सर्वात शेवटी ज्यावेळी जय आदितीला दुसरे छोटे मांजरचे पिल्लू आणून देतो ना ...
त्यावेळी ती खुद्कन हसते ... आणि त्याला मिठी मारते ....
सगळ्यांच्या दृष्टीने ... तो क्षण खूप महत्वाचा....
पण तिचे काय ? .... जी आधी तिला सोडून गेली ....
जिच्यासाठी हा आटापिटा सुरू होता....
नक्की तिच्यासाठीच होता ना ....?
की दुसरी मांजर आणून दिली म्हणजे ती गेल्याचे दुख: संपले ..........?
प्रश्न मला पडला आणि खूप वेदना झाल्या ...
एक गोष्ट सांगू ... ज्याही वेळी तुम्ही हे वाचाल ना .. त्यावेळी नक्की Reply करा ... की तुम्हाला काय वाटले ... मला जे वाटले ... त्यात नेमके काय साचले आहे ... तिला जे वाटले ते योग्य आहे का ?
एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?