Saturday, May 10, 2008

शेवटी काय तर ..

एखादी गोष्ट आपण कशी समजून घायवी त्याच्या तर्हा वेगवेगळ्या असतात...
कुणाची कशी तर कुणाची कशी...
प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा

माणसाच्या मनात काय चालू आहे ते असे वरुन कळणे अवघडच...
तरी माणूस प्रयत्न करत असतो दुसर्‍याला समजून घेण्याचा...
आणि स्वत:च्या मनाचा दुसर्‍याला थान्गपत्ता न लागू देण्याचा...

मनात काहीतरी वेगळेच चालू असते आणि दाखवत तो काही वेगळेच असतो...
काय माहीत नेमका कशाचा प्रयत्न असतो हा...
आपण खूप वेगळे आहोत हे दाखवण्याचा ...
की आपण इतरांसारखे नाही आहोत हे दर्शवण्याचा...

चुकही तो करत असतो...
चांगलेही तो घडवत असतो...
बघणारे सगळेच बघत असतात..
पण दिसत काही वेगळेच असते आणि सत्य काही वेगळेच असते...
जर दिसणारे चांगले वाटत असेल तर ...तो तेच दाखवण्याचा प्रयत्न करतो...
आणि जर सत्य चांगले असेल तर तो सत्य पुढे आणण्याचा प्रयत्न करतो..

शेवटी काय तर .. Its all about Show off !!

4 comments:

मोरपीस said...

खरच प्रत्येकाच्या मनात वेगळेच असते. खूप मस्त लेख आहे आपला

Asha Joglekar said...

अगदी बरोबर. पण आपण सर्वजणच केंव्हा न केंव्हा असं करतो नाही का ?

Asha Joglekar said...
This comment has been removed by the author.
Mess up in Thought said...

Its all about wearing a "Maukhvata" .

thats why when it comes to be official , we wants it on paper.

एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?