Monday, June 23, 2008

थोडासा पाउस

आळस येतोय
आणि झोपही
ही मरगळ कशी झटकावी तेच कळत नाहीए
जाईन लवकरच घरी ..
कुठेतरी बाहेर जावे वाटतेय
आणि पावसात भिजावेसे वाटतेय
बाइक वर जाईन
जवळपास कुठेतरी
एखादी नदी ...
एखादा तलाव
एखादा झरा
थोडासा पाउस
आणि रेनकोट नसलेला मी ...
सोबत थोडीशी कांदा भजी
आणि मग एक एक थेंब तोंडावर घेत
न्याहाळात बसायचे निसर्गाला ..
पाण्यात पाय बुडवून
पाण्यावर उमटलेले तरंग .. पाहील ..
आणि त्यासोबत .. लहानपनीचा चिखल आठवेल...
कधीतरी ... पावसाच्या पाण्यात सोडलेले जहाजही आठवेल...
आणि परत एकदा ..
खिशातले कुठलातरी तसा महत्वाचा एक बीन महत्वाचा कागद काढेन ....
नाव बनवण्यसाठी ...
बुडाली तरी मजा .. आणि पुढे गेली तरी मजा ..
थोडेसे बालपण मिळवायला .. असा एकांतच लागेल
डोक्यावर नको वाटत असताना ... काहीतरी घेईन ..
कारण गारवा ऐकायचे असेल...
आणि गाण्याच्या चालीमधे धुंद होऊन पाण्या मध्धे पुढे पुढे सरकत राहील
बराच आत जाईल... आणि मग लक्षात येईल...
अरे ... मला मला तर तर नाही ...
तिथेच थोडा वेल घुटामळेल आणि ...
जगातल्या एका सुंदर आणि आर्त प्रवासाची सुरूवात होईल. निसर्गाच्या आणि नदीच्या सहवासामध्ये..

2 comments:

Unknown said...

sounds interesting........
r u thr on orkut?????

Shirish Jambhorkar said...

Thanks , search for Shirish Jambhorkar

एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?