ती म्हणाली एक गोष्ट सांगिशील ," श्रध्धा आणि विश्वास या मधे नेमका फरक
तो काय ?" ...
विश्वास ठेवण्यासाठी माणसाचा भूतकाळ पुरेसा असतो
आणि कृती करायची जबाबदारी दुसर्यावर ढकललेली असते ...
श्रध्धेचे तसे नसते ...
आपली कृती आपल्या श्रध्धेला अजुन बळकट करते ...
आणि जबाबदारी स्वत:वर घेण्यासाठी तत्पर असते ती म्हणजे श्रध्धा ...
------------------------------------------------------------------------------------------------
गिरीश: माझी एका गोष्टीवर श्रध्धा आहे आणि माझ्या श्रध्धेवर माझा विश्वास आहे...
म्हणजे ?
शिरीष: श्रध्धेवर विश्वास नसतो
श्रध्धेवर विश्वास म्हणजे अंधश्रध्धा
श्रध्धा निर्मल असते
गिरीश: म्हणजे विश्वास निर्मल नसतो...
शिरीष: विश्वासा मागे गरज असते .. कधीकधी स्वार्थ असतो
आणि कुणी विश्वास मोडला तर ... जबाबदारी त्याच्यावर ढकलून आपण मोकळे
व्हयायचा मार्गही असतो
गिरीश: तुझा देवावर विश्वास आहे की श्रध्धा?
शिरीष: देवावर श्रध्धा असावी
गिरीश: Just casual ... नास्तिक किंवा आस्तिक असा मुद्दा नाही
श्रध्धा ही विश्वासातून जन्माला येते असे माझे मत आहे
शिरीष: हो ती आता .. कारण आपल्याला .. हजारो वर्षांचा भूतकाळ आहे म्हणून
म्हणून बर्याच जणांना अजूनही त्यांचा देवावरचा विश्वास म्हणजे श्रध्धा वाटते
गिरीश: याही पेक्षा मला वाटते कि..ज्या विश्वासाला परखुन बघण्याची कधीच
गरज वाटत नाही ...ती श्रध्धा..ऽनि ज्या ठिकाणी पारख ण्याचा सवाल येतो
तिथे आपण आपल्या विश्वासावर शंका घेतळालेलीच असते..
शिरीष: ..ज्या विश्वासाला पारखून बघण्याची कधीच गरज वाटत नाही... म्हणजे?.
गिरीश: देवावरचा विश्वास .... तुम्ही तो कधी पारखून बघण्याच्या नादी
लागत नहि..तो कायम असतो.. कधीही .. कुठेही..
शिरीष: नादी का लागत नाही ...?
गिरीश: जर त्यात शंका उत्पन्न झाली की तो विश्वास होतो श्राध्धा राहत नाही
गिरीश: नादी लागत नाही असे मी म्हणालो नहि...जेव्ह नदी लागतो तेव्हा
तो फक़त विश्वास असतो ... नदी लागलो नाही तर ती श्राध्धा असते..
शिरीष: असे नसते रे ... चंगुल पानावरची श्राध्धा आणि देवावरची श्रध्धा
हे वेगवेगळे असेल .. तर असे नसते
गिरीश: ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत .. त्यामुळे आपल्या व्याख्या पण
सापेक्ष होतील .. पण एक गोष्ट मला नक्की वाटते चांगुल पणा वरचा विश्वास
दृढ झाला की श्रध्धा व्हायला वेळ लागत नाही
शिरीष: चांगुल पणा वर विश्वास असणारा माणूस ... म्हणजे .. पापभिरू
सामान्य माणूस .. आणि चांगुल पानावर श्रध्धा असणारी व्यक्ती म्हणजे ...
श्यामची आई...
गिरीश: या मताशी मी सहमत आहे ... जेव्हा त्या सामान्य पापभिरू माणसाचा
विश्वास श्रध्धेत प्रवर्तीत होईल तेव्हा तो ही श्यामाच्या आईसारख्याच
कॅळीबेरचा होईल हे नाकारता येणार नाही..
गिरीश: पण तरीही श्रध्ेच्या मुळशी विश्वास असावा लागतोच या मताचा मी आहे..
शिरीष: You can always be
शिरीष: माझेही तेच मत आहे ....
फक्त एव्हडेच ... की मी फरक सांगत होतो...
आणि तू डिपेंडेन्सी सांगत होता
गिरीश: चला छान Refresh वाटळ .. बर्याच दिवसाणी काही तरी विचार
कार्याला मिळाला साहित्यात...
शिरीष: :)
No comments:
Post a Comment