Monday, May 12, 2008

ओढणी

............... ओढणी ..............
सायकळच्या चाकात
ओढणी अडकून राहिली
तिच्या चेहर्यावरची
काळजी मीही पाहिली

म्हणाली नाही ती की
मदत हवी म्हणून
मीच गेलो विचारायला
मदत हवी का म्हणून?

खूपच घट्ट अडकून बसली होती
ती त्या चाकात
माझ्याकडे पाहून
हसत होती गालात

ओठ च नव्हते बोलत नुसते
डोळेही सांगत होते
ओढनिचे शरीरही
माझ्या स्पर्शाने थरथरत होते

हळूवार हातांनी तिला
बाहेर त्यातून काढले
तिनेही हसत हसत
माझे आभार मानले

परत जेव्हा ती तिच्या
खांद्यावर ओढली गेली
माझ्या स्पर्शाचा अनुभव
तीही तिला देत गेली

अचानक या प्रसंगातून
बाहेर मी पडलो
सोडून तिला जाताना
मनातल्या मनात रडलो

नाव विचारायचे
तर राहूनच गेले
मनातले विचार ओळखून
तिनेच ते सांगितले

याच तर प्रसंगातून
प्रेम आमचे बहरले
आंब्याचे झाडही
पावसाळ्यात मोहरले

अजूनही तिची ओढणी
स्पर्श माझा मागत असते
वेळेचे भान ठेवून
तीही तिची साथ सोडत असते

--- शिरीष ( ही माझी पहिली --- मला अगदी मनापासून आवडणारी कविता.... )

5 comments:

Asha Joglekar said...

सुंदरच आहे ओढणी, प्रेम रंगाची चमक ही आहे तिच्या वर .

Unknown said...

Hi,

Love Marathi videos? See the biggest collection of marathi videos on
MarathiTube

Admin
MarathiTube

Shirish Jambhorkar said...

thanks aashaji

Anonymous said...

Mast aahe..

Unknown said...

mala khup awadnarya kavitan paiki ODHANI he ek......

एवढ्या लोकांनी वाचलाय माझा ब्लॉग!
http://www.free-website-hit-counters.com
Download a free web counter here.
IndiBlogger - Where Indian Blogs Meet
 
Who links to my website?