समजून घेणे म्हणजे थोडा त्रास करून घेणे
आणि व्यक्त करणे म्हणजे मोकळे होणे ...
व्यक्त होण्यासाठी लागतो तो धाड्सीपाणा
आणि समजून घेण्यासाठी लागते ती सहनशक्ति
एखाद्या माणसाला ओळखणे खूप अवघड असते
कारण माणूस प्रत्येक क्षणाला अनुभव घेत असतो... आणि प्रत्येक अनुभव माणसाला बदलत असतो....
त्यामुळे स्वत:चे निरीक्षण करणे हीच जगातील सर्वात गरजेची गोष्ट.. आहे ...
आपल्यातले सूक्ष्म बदल ज्यावेळी स्वत:ला जाणवतात ना ... त्यावेळी आपण दुसर्याची काळजी घेण्यास पात्र असतो... :)
मी कसा आहे नेहमीच मला प्रश्न पडतो ...
पण प्रत्येक वेळी प्रश्नाला उत्तर देता येईल असे नसते...
काही वेळेस उत्तर भेटते... तर काही वेळेस खरा मी भेटतो...
बर्याचदा गुंता वाढत जातो ... आणि नवीन प्रश्न तयार होतात...
तसा मी खूप सरळ साधा
(
साधा म्हणजे ...
कुणाच्या विरुद्ध डावपेच न रचणारा ..
आणि कोणी डावपेच जर माझ्या विरुद्ध डावपेच रचले तर व्यथीत होणारा ...
पण तरीही जाऊ दे म्हणणारा ..
)
आणि विचारी मुलगा..
खूप मित्र असलेला ...
मित्र ही जिवंतपणाची खूण-- आणि चांगले मित्र जमवने ही आयुष्यातील सर्वात मोठी आणि कायमस्वरूपी सोबत राहणारी गोष्ट ...
कुणीही माझ्यावर विश्वास टाकावा आणि मी त्यास पात्र ठरावे ... एव्हडीच इच्छा ... आणि शक्यतो ... नेहमीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो...
कधी कधी खूप गरज असूनही स्वार्थी न होता येणारा ....
थोडासा आळशी ... थोडासा झोपाळू ...
पण तरीही काम अंगावर आले तर शिंगावर घेणारा.....
आणि आवडीच्या कामात स्वत: ला झोकून देणारा...
मी पीत नाही म्हणून बरा आहे ...
पण मला माहीत आहे ...
पिल्यानंतरचा मी एकदम खरा आहे .
मित्र : - जगात जो सर्वात जास्त गृहीत धरला जातो तो मित्रा....
आणि या जगात आई वडिलांशीवाय इतर कुणीही सर्वात जास्त गृहीत धरल्या जात नाही....
They are our Best of Best friends....
------------------------------------------------------
Tuesday, May 13, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Kharach swatala olakhane hich jagatali sarvat awaghad gost ahe. mhanun..Know Yourself and then Define Yourself...tasa tu kharach khup sadha ani saral ahes. Swatashi ani swatachya vicharanshi pramanik rahanara.
Post a Comment